मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत ब्लॉक आहे.