नवी मुंबई : गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी होत आहे. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते कुडाळदरम्यान धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने याआधीच विविध मार्गावर विशेष गाड्या सोडल्या आहेत.