मुंबई : मुंबईत भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 'कुलाबा - वांद्रे - सीप्झ' मार्गावरील पहिला टप्पा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. ही माहिती भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करुन दिली.
मेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाईन
राज्यातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो मार्गिका
मार्गिकेची लांबी ३३ किमी
भूमिगत मेट्रो मार्गिकेतील २७ पैकी १० स्थानकांचा पहिला टप्पा
पहिला टप्पा २४ जुलै रोजी सुरू होणार
स्थानकांची नावं - आरे कॉलनी, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १, सांताक्रुझ, विद्यानगरी, वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी)
भूमिगत मार्गिकेचे वैशिष्ट्य - फलाट आणि मार्गिका या दरम्यान काचेची भिंत असेल. मेट्रो येताच काचा सरकतील आणि प्रवासी मेट्रोत प्रवेश करतील. मेट्रोतील प्रवासी फलाटावर उतरू शकतील. नंतर काचेची भिंत पुन्हा पूर्ववत होईल. यामुळे मेट्रो नसताना कोणीही फलाटावर जाऊ शकणार नाही.