Friday, September 13, 2024 07:09:35 AM

Mumbai High Court
'महाराष्ट्र बंद बेकायदेशीर'

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला.

महाराष्ट्र बंद बेकायदेशीर

मुंबई : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला. तसेच उच्च न्यायालयाने बंद केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य सरकारला दिले. 

...म्हणून पुकारलेला बंद

बदलापूर येथे शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. या प्रकरणात आरोपीला अटक झाली. पण घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला. बंदच्या विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. 

'पवारांकडून ट्वीटची लबाडी'

मविआने पुकारलेला महाराष्ट्र बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला. यामुळे बंद मागे घेण्याचे आवाहन करणारे ट्वीट करुन शरद पवारांनी लबाडी केली आहे; असे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री