Thursday, July 04, 2024 08:54:11 AM

Mumbai Election Result
'त्या' ५ आमदारांमुळे मुंबईत महायुतीला फटका

केंद्रात ज्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता येते सर्वसाधारणपणे त्यालाच निवडणुकीत मुंबई साथ देते, असा इतिहास आहे. त्याला अपवाद फक्त १९८० ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर ही २०२४ची निवडणूक.

त्या ५ आमदारांमुळे मुंबईत महायुतीला फटका

मुंबई : केंद्रात ज्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता येते सर्वसाधारणपणे त्यालाच निवडणुकीत मुंबई साथ देते, असा इतिहास आहे. त्याला अपवाद फक्त १९८० ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर ही २०२४ची निवडणूक. केंद्रात भाजपा आघाडीच्या २९२च्या आसपास जागा मिळवून पुन्हा सत्तेत येत असताना मुंबईकरांनी मात्र महाविकास आघाडीला साथ दिल्याचे दिसून येते...२०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपा आघाडीच्या पारड्यात टाकल्या होत्या...

मात्र देशासह राज्यात आणि मुंबईत महायुतीला मोठा फटका बसला...राज्यात ४८ पैकी ४५ जागांवर विजयी होणार असा विश्वास असणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले...मुंबईच्या ६ जागांपैकी फक्त दोनच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले...उत्तर मुंबईत पियूष गोयल  ३ लाख ५७ हजार ६०८ मतांनी विजयी झाले तर वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर केवळ ४८ मतांनी विजयी झाले....
मुंबईतले निकाल आपण सविस्तर पाहुयात...

उत्तर मुंबई
पीयूष गोयल विजयी भाजपा 680146 (+ 357608)
भूषण पाटील पराभूत काँग्रेस 322538 

उत्तर मध्य मुंबई
 वर्षा गायकवाड विजयी काँग्रेस 445545 (+ 16514)
उज्वल निकम पराभूत भाजपा 429031 

वायव्य मुंबई
रविंद्र वायकर विजयी शिवसेना 452644 (+ 48)
अमोल कीर्तिकर पराभूत शिउबाठा 452596

ईशान्य मुंबई
संजय दिना पाटील विजयी शिउबाठा 450937 (+ 29861)
मिहिर कोटेचा पराभूत भाजपा 421076

दक्षिण मध्य मुंबई
अनिल देसाई विजयी शिउबाठा 395138 (+ 53384)
राहुल शेवाळे पराभूत शिवसेना 341754 

दक्षिण मुंबई
अरविंद सावंत विजयी शिउबाठा 395655 (+ 52673)
यामिनी जाधव पराभूत शिवसेना  342982 

मुंबईत महायुतीच्या ४ उमेदवारांना ५ आमदारांच्या कामगिरीचा फटका

मुंबई भाजपाचे ३ आमदार उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी

आमदार तमिल सेल्वन, राम कदम आणि भारती लव्हेकरांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर

आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात वायकरांना केवळ २२१ मतांची आघाडी

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या मतदार संघात ऍड. निकम यांना अवघी ३ हजार ६०६ मतांची आघाडी

सुनिल राणे +1,00,775
योगेश सागर +79,096
अतुल भातखळकर +70,001
मनिषा चौधरी  + 62,247
मिहिर कोटेचा +60,442
पराग आळवणी +51,325
मंगल प्रभात लोढा +48,287
पराग शाह +33,609
विद्या ठाकूर  +23,742
कालिदास कोळंबकर +10634
राहुल नार्वेकर +9,094

आशिष शेलार +3,606
अमित साटम +221
कॅप्टन तमिल सेल्वन -9,312 (पिछाडीवर) 
राम कदम -15,772 (पिछाडीवर) 
भारती लव्हेकर -21,090 (पिछाडीवर)


सम्बन्धित सामग्री