Tuesday, July 02, 2024 09:52:23 PM

Modi 3.0
मोदींपुढे रालोआत समतोल राखण्याचे आव्हान

मंत्रिमंडळ स्थापन करताना रालोआत समतोल राखण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आहे.

मोदींपुढे रालोआत समतोल राखण्याचे आव्हान

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याआधी २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. रालोआतील इतर घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा या भाजपासाठी लाभांश होत्या. याउलट २०२४ मध्ये रालोआला बहुमत मिळाले आहेत. यामुळे मंत्रिमंडळ स्थापन करताना रालोआत समतोल राखण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आहे. लोकसभेतील पाच खासदारांच्या बदल्यात एक मंत्रिपद या सूत्रानुसार मंत्रिपदे दिली जात असल्याचे सूत्रांकडून समजते.

आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू तसेच बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नितीश कुमार या दोघांनी त्यांचे म्हणणे भाजपाला कळवले आहे. नितीश यांनी सैन्यातील अग्निवीर भरती योजनेला विरोध केला आहे. तसेच नितीश आणि चंद्राबाबू या दोघांनी आपापल्या राज्यांना विशेष दर्जा मिळावी अशीही मागणी केली आहे. या मागण्यांवर भाजपाचे अधिकृत उत्तर अद्याप समजलेले नाही. 

  1. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार
  2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार
  3. मोदींच्या शपथविधीनंतर त्यांचे मंत्रिमंडळातले सदस्य शपथ घेणार
  4. महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता : नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव चिखलीकर, रामदास आठवले
  5. मोदी सरकारचे संभाव्य मंत्री : नितीन गडकरी, अमित शहा, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, रामदास आठवले, निर्मला सीतारामन, बीएल वर्मा, पंकज चौधरी, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, मनोहर लाल खट्टर, रक्षा खडसे, नित्यानंद राय, हर्ष मल्होत्रा ​​भगीरथ चौधरी, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी, किरेन रिजिजू, जी. प्रसाद, रवनीत, जी. किशन रेड्डी, बंदी संजय, आरएलडी प्रमुख जयंत सिंह चौधरी, धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, रामनाथ ठाकूर, राम मोहन नायडू, पेम्मासानी चंद्रशेखर, सर्बानंद सोनोवाल, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव, सुरेश गोपी, हरदीप सिंग पुरी, राजनाथ सिंह, राव इंद्रजित सिंग, अजय टमटा, जीतन राम मांझी, चिराग पासवान

सम्बन्धित सामग्री