Wednesday, April 16, 2025 09:09:07 PM

मनसे पुण्यातील पाच विधानसभा लढवणार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मनसे पुण्यातील पाच विधानसभा लढवणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे रविवारी २० ऑक्टोबर रोजी पुण्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पुण्यात लढवणार असलेल्या जागांबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे. मनसे पुण्यातील हडपसर, कोथरुड, शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील निवडक जागांवरही मनसे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 
 

        

सम्बन्धित सामग्री