Sunday, September 08, 2024 06:46:16 AM

Raj Thackeray
'विधानसभेत दोनशे ते अडीचशे जागा लढवणार'

विधानसभेत दोनशे ते अडीचशे जागा लढवणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.

विधानसभेत दोनशे ते अडीचशे जागा लढवणार

मुंबई : विधानसभेत दोनशे ते अडीचशे जागा लढवणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. लवकरच मनसेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. या चर्चेतून संभाव्य उमेदवारांची नावं राज यांच्याकडे पाठवली जातील. अखेरच्या टप्प्यात उमेदवाराची निवड राज ठाकरे यांच्या मार्फत केली जाईल. याआधी राज ठाकरे १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक पुढील दोन - पाच दिवसांत जाहीर केले जाईल, असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणात फरक असतो. यामुळे लोकसभेवेळी काय झाले ते विसरुन कामाला लागा. मनसेला विजयी करण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. विधानसभेत जास्तीत जास्त आमदार पाठवून राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी काम करायचे आहे, असे सूचक वक्तव्य राज यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी केले. 

लाडकी बहीण सारख्या योजनांऐवजी राज्य सरकारने रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य, पाणी या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे, असे राज ठाकरे म्हणाले. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना टोला लगावत लाडके भाऊ, बहिण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असेही वक्तव्य राज यांनी केले. 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
'मराठवाड्यांचं वाळवंट होईल, शासनाने लक्ष द्यावे'
'देशात बेमुसार जंगलतोड सुरु आहे'

आपल्यातील काही गोष्टी बदलण्याची गरज - राज

'लाडके भाऊ, बहिण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते'
'योजनांऐवजी बेरोजगारी, आरोग्य, पाणी प्रश्नावर लक्ष द्या'
लाडकी भाऊ, लाडकी बहिण योजनेवर राज यांची टीका

'येणाऱ्या विधानसभेत सर्व पक्षात न भुतो असं घमासान होईल'

'कोण कोणत्या पक्षात आहे कळतच नाही'
'पक्ष बदलणाऱ्यांना मी रेड कार्पेट आणतो'

'निवडून येणाऱ्यांनाच तिकीट दिलं जाईल'

'दोनशे ते अडीचशे जागा लढवणार'

'एक ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार'

'विधानसभेला मनसेचे आमदार बसवायचे आहेत'


सम्बन्धित सामग्री