Saturday, December 21, 2024 06:31:49 PM

Maharashtra
महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक, हजारो रोजगारांची संधी

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने विविध उद्योग समुहांच्या एक लाख वीस हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली.

महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक हजारो रोजगारांची संधी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने विविध उद्योग समुहांच्या एक लाख वीस हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली. समितीने तीन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे राज्यात हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे.

  1. तळोजा एमआयडीसीतील अदानी समुहाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पात ८३ हजार ९४७ कोटींची गुंतवणूक, अपेक्षित रोजगार पाच हजार
  2. चाकणमध्ये स्कोडा फॉक्सवॅगनच्या वाहन निर्मिती प्रकल्पात १५ हजार कोटींची गुंतवणूक, अपेक्षित रोजगार हजार
  3. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर वाहन प्रकल्पात २१ हजार २७३ कोटींची गुंतवणूक, अपेक्षित रोजगार आठ हजार ८००

देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. मागील दोन वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात २०२४ - २५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या काळात तीन लाख ६२ हजार १६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती. आता सव्वा दोन वर्षांत राज्यात तीन लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारने आणली आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo