मुंबई : उत्सव काळात नफेखोरीसाठी अनेकदा खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना खाण्यापिण्याचे सकस पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मिल्कोस्कॅन यंत्राचा वापर करणार आहे. मिल्कोस्कॅन यंत्राच्या मदतीने दुधातील भेसळ ओळखणे सोपे झाले आहे. हे यंत्र हाताळणेही सोपे आहे. यामुळे दुधाच्या भेसळीला आळा घालण्यास मदत होणार आहे.