Sunday, December 22, 2024 11:50:28 AM

BRS
राज्यातील भारत राष्ट्र समिती राशपत ?

महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीची राज्य कार्यकारिणी तसेच पक्षाचे राज्यातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राशपत प्रवेश करणार आहेत.

राज्यातील भारत राष्ट्र समिती राशपत

पुणे : महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीची राज्य कार्यकारिणी तसेच पक्षाचे राज्यातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राशपत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भारत राष्ट्र समितीचे सदस्य राशपत जाणार आहेत. या संदर्भात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्र कार्यकारिणी आणि राशप अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली.

के. चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणच्या मागणीसाठी आंध्रमध्ये राजकीय आंदोलन सुरू केले. यातूनच पुढे तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाची स्थापना झाली. तेलंगण हे स्वतंत्र राज्य झाल्यावर विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा विजय झाला. के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री झाले. यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने के. चंद्रशेखर राव यांनी पक्षाचे नाव बदलून महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पक्षाचे तेलंगण राष्ट्र समिती ऐवजी भारत राष्ट्र समिती करण्यात आले. पण भारत राष्ट्र समिती राज्यात अपेक्षेप्रमाणे वेगाने पसरली नाही. अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत राष्ट्र समितीची राज्य कार्यकारिणी तसेच पक्षाचे राज्यातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राशपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo