Monday, July 01, 2024 03:05:55 AM

Mumbai Railway News
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या तीन दिवसांच्या ब्लॉकच्या काळातील ९५६ लोकल फेऱ्या आणि ७२ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी १ जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी फलाट क्र.१०-११ ची लांबी वाढवणे आणि ठाणे स्थानकातील फलाट क्र. ५ चे रुंदीकरण करणे यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. सीएसएमटीतील ३६ तासांच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक आहे. फलाट रुंदीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अडीच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी मॉड्युलर फलाट उभारण्यात येणार आहे. यासाठी ४४ ओव्हरहेड वायरला आधार देणारे खांब योग्य ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्या बारा ते पंधरा तासांत रुळ सरकवण्याची कामे करण्यात येतील. त्यानंतर ७२५ प्री-कास्ट बॉक्सच्या मदतीने मॉड्युलर फलाट उभारण्यात येईल. 

ठाण्यात ६३ तासांचा ब्लॉक
कळवा ते ठाणे
जाणाऱ्या - येणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावर
३१ मे रोजी रात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार

सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक
सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड
जाणाऱ्या - येणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावर, यार्ड मार्गिकांवर
१ जून मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०
सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल फेऱ्या रद्द

ब्लॉकमुळे रद्द असलेल्या लोकल फेऱ्या
पहिला दिवस (शुक्रवार) - १८७ लोकल / ४ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
दुसरा दिवस (शनिवार) - ५३४ लोकल / ३७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
तिसरा दिवस (रविवार) - २३५ लोकल / ३१ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
एकूण - ९५६ लोकल / ७२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द


सम्बन्धित सामग्री