नाशिक : दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. अनेक उपाययोजना आणि प्रयत्न करून देखील नदीला प्रदूषण मुक्त करण्यात राज्य सरकार असो किंवा स्थानिक प्रशासन या यंत्रणांना यश आले नाही. नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मास्टर प्लॅन आखलाय. या मास्टर प्लॅनला अंतिम रूप देण्यात आले असून तब्बल 1800 कोटी रुपये खर्चून या प्रकल्पांची उभारणी होणार आहे.
हेही वाचा : लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी नवीन एसटीपी करायचा आहे. नेटवर्क आणि एसटीपी प्लॅन करायचा आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 1800 कोटींची मागणी आहे आणि ते वेगवेगळ्या फंडातून करणार असल्याचे नाशिक मनपा आयुक्ती मनीषा खत्री यांनी सांगितले.
काय आहे मास्टर प्लॅन?
शहरात एकूण नऊ ठिकाणी एसटीपी यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत. गोदावरी नदीत थेट मलजल मिसळण्यास आळा घातला जाणार आहे. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी नदी स्वच्छ केली जाणार आहे. नदीच्या काठावरील प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सिंहस्थ कुंभमेळ्याआधी गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत हे स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर लढा देणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. गोदावरीसाठी प्रशासनाने टाकलेले हे पाऊल नक्कीच नदीला प्रदूषण मुक्तीकडे घेऊन जाणारं ठरणार आहे. त्यामुळे गोदामाई मोकळा श्वास घेणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.