Thursday, September 12, 2024 06:22:55 PM

Mumbai
मराठा आंदोलकांना घेतले ताब्यात

मराठ्यांच्या आरक्षणासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होते. पण पोलिसांनी आधीच आंदोलकांना ताब्यात घेतले.

मराठा आंदोलकांना घेतले ताब्यात

मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार असल्याची घोषणा मराठा आंदोलकांनी केली. आंदोलनासाठी कार्यकर्ते गिरगाव येथे जमू लागले. घोषणाबाजी करत ते गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने निघाले होते. कार्यकर्त्यांचा जमाव बघून मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सुरक्षेचे कारण देत आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रमेश केरे यांच्यासह अनेक आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमेश केरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिली. वेळ मिळताच केरेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने फडणवीसांची भेट घेतली.

गिरगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
रमेश केरेंसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
केरेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या - रमेश केरे
मराठा समाजाचे खरे मारेकरी शरद पवार - रमेश केरे
मराठा क्रांती ठोक मोर्चा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर - रमेश केरे
आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या निवासस्थानी होणार - रमेश केरे
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा मनोज जरांगेंना पाठिंबा


सम्बन्धित सामग्री