कोल्हापूर : मनोज जरांगे यांचे आरक्षणाचे आंदोलन भरकटले आहे. हा आरोप मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला. जरांगेंनी आंदोलकांचा राजकीय हेतूने वापर करायला सुरुवात केली आहे. विशिष्ट राजकीय नेत्यांच्या समर्थनात आणि ठराविक नेत्यांच्या विरोधात भूमिका घेऊन आंदोलकांचा वापर सुरू आहे. यामुळेच जरांगेंचे आंदोलन भरकटले असल्याचे मराठा समन्वयक दिलीप पाटील म्हणाले.