Friday, June 21, 2024 11:38:20 AM

Manoj Jarange
जरांगेंचं उपोषण स्थगित

सगेसोयरे यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे.

जरांगेंचं उपोषण स्थगित

जालना : सगेसोयरे यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. राज्य शासनाने एक महिन्याच्या आत आरक्षण द्यावे, नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीला याच मुद्यावर उमेदवार उतरवू; असा इशारा जरांगेंनी दिला आहे. याआधी राज्य शासनाच्यावतीने संदिपान भुमरे आणि शंभूराज देसाई यांनी जरांगेंशी चर्चा केली. चर्चेतून तोडगा निघाला आणि जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले.


सम्बन्धित सामग्री