छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध भागातून जिल्ह्यात 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अमोल वैजनाथ गलाटे आणि वाल्मीक गणेश शहाणे असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगारांचे नाव आहेत. या गुन्हेगारांच्या ताब्यातून एकूण 2 दुचाकीसह 9 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. दुचाकीवरून चोरी होत असल्याचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चोरीच्या घटनांचा पाठपुरावा जवाहरनगर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर आरोपींनी 12 गुन्ह्याची कबुला दिली आहे. अमोल वैजनाथ गलाटे आणि वाल्मीक गणेश शहाणे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्हेगारांकडून 2 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच 9 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.