Monday, August 05, 2024 02:46:05 AM

MLC Election 2024
फडणवीस महायुतीच्या विजयाचे शिल्पकार

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीचे नऊ तर मविआचे तीन पैकी दोन उमेदवार विजयी झाले.

फडणवीस महायुतीच्या विजयाचे शिल्पकार

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीचे नऊ तर मविआचे तीन पैकी दोन उमेदवार विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा ज्येष्ठांच्या सभागृहातील निवडणुकीत फडणवीसांच्या नियोजनाचा राज्य भाजपाला आणि मित्र पक्षांना फायदा झाला. 

भारतीय जनता पार्टीचे पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे हे चार उमेदवार विजयी झाले. भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या रयतक्रांती  संघटनेच्या सदाभाऊ खोतांचाही विजय झाला. शिवसेनेचे भावना गवळी, कृपाल तुमाने हे दोन उमेदवार जिंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे दोन उमेदवार विजयी झाले. 

महाविकास आघाडीच्या तीन पैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिउबाठाचे मिलिंद नार्वेकर जिंकले. राशपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. शरद पवार पाठिशी असूनही जयंत पाटलांचा पराभव झाला. 

विधान परिषद निवडणुक - जुलै २०२४
महायुतीचे नऊ उमेदवार विजयी
महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी

भाजपा - ५ उमेदवार विजयी

पंकजा मुंडे – २६ (विजयी)

परिणय फुके – २६ (विजयी)

योगेश टिळेकर – २६ (विजयी)

अमित गोरखे – २६ (विजयी)

सदाभाऊ खोत – २३ (दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयी)

शिवसेना - २ उमेदवार विजयी

भावना गवळी – २४ (विजयी)

कृपाल तुमाने – २५ (विजयी)

राष्ट्रवादी काँग्रेस - २ उमेदवार विजयी

राजेश विटेकर – २३ (विजयी)

शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)

महाविकास आघाडीचे उमेदवार

काँग्रेस - १ उमेदवार विजयी

प्रज्ञा सातव – २५ (विजयी)

शिउबाठा - १ उमेदवार विजयी

मिलिंद नार्वेकर – २२ (दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयी)

राशपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारा उमेदवार पराभूत

जयंत पाटील (शेकाप) – १२ पराभूत

महत्त्वाचे

देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार
परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारली
मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव

काँग्रेसची ७ मते फुटली, उमेदवार मात्र जिंकला
मविआमध्ये काँग्रेस गळपटली 

अजित पवारांच्या नियोजनाने राष्ट्रवादीची सरशी
दादांनी काकांना कोपऱ्यात गाठले 

विधान परिषद निकालानंतर मविआच्या गाठी सैल सुटल्या
आगामी विधानसभेसाठी मविआच्या नाकी नऊ येणार

मुंडेंचा वनवास चार वर्षांनी संपला
वंजारी आनंदले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जयंत पाटील यांच्या सोबत दगाफटका 
विधान परिषदेत शेकाप आक्रसला
पंचवीस वर्षांचा राजकीय प्रवास पुन्हा खंडित 

काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा अजित पवारांना
अजित पवारांना मिळाली जास्तीची ७ मते

हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक फिरवली
भाजपाला संख्याबळापेक्षा अतिरिक्त २७ मते 


सम्बन्धित सामग्री