मुंबई : महायुतीने विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. ठिकठिकाणी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत नृत्य करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मविआ विधानसभेच्या 288 पैकी 45 जागांवरच विजय मिळवू शकली किंवा आघाडी घेऊ शकली. मविआत ठाकरे सेनेने 20, काँग्रेसने 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. इतर बारा जागांवर विजयी झाले किंवा आघाडी घेऊ शकले. महायुतीच्या या विजयी झंझावातापुढे मविआचा पालापाचोळा झाला. दणदणीत विजय मिळाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यांची प्रभावी अंमलबजावणी महायुतीसाठी लाभदायी ठरली. तर व्होट जिहाद आणि आरक्षणाचे राजकारण याचा फायदा होईल या आशेवर राहिलेली मविआ तोंडावर आपटली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.
भारतीय जनता पार्टी 100 जागांवर विजयी आणि 33 जागांवर आघाडीवर
शिवसेना 47 जागांवर विजयी आणि 10 दहा जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर विजयी आणि 4 जागांवर आघाडीवर
महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली.