Saturday, April 12, 2025 07:07:15 AM

महायुतीचा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

महायुतीचा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

महायुतीचा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

मुंबई : महायुतीचा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अद्याप तीस ते चाळीस जागांचा तिढा आहे. हा तिढा पुढील दोन ते तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे पूर्ण करेल. भाजपा शिस्तीला अनुसरुन संसदीय बोर्डाकडून शिक्कामोर्तब करुन घेतल्यानंतरच उमेदवार जाहीर करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असून लवकरच सूत्र जाहीर होईल. चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

           

सम्बन्धित सामग्री