मुंबई : विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी आतापर्यंत नेहमी अटीतटीचा सामना झाला आहे. लोकसभेला महायुतीला अपेक्षित यश मिळाले नव्हते, मात्र देवेंद्र फडणवीस यांची रणनिती विधानसभेला कामी आली. मतदारांनी देवाभाऊ म्हणत फडणवीसांना भरभरून मतं दिली आहेत. फडणवीस यांनी विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांसाठी विशेष रणनिती आखली होती. त्यानुसार पूर्व विदर्भातील 32 आणि पश्चिम विदर्भातील 30 अशा एकूण 62 जागांपैकी 48 जागांवर महायुतीने बाजी मारली आहे. एकट्या भाजपाला 38 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या आहेत. एकेकाळी स्वतःचा बालेकिल्ला म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे.