मुंबई : टपाली मतमोजणी झाली आहे. आता ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू आहे. काही ठिकाणी दुसऱ्या फेरीची तर काही ठिकाणी पहिल्या फेरीची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, महायुती आणि मविआ यांच्यात 'काँटे की टक्कर' सुरू आहे. मविआ १२० पेक्षा जास्त जागांवर तर महायुती १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. पण ही आघाडीवर दर पाच दहा मिनिटांनी बदलत आहे.
महायुतीचे तानाजी सावंत 69 मतांनी आघाडीवर
महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आघाडीवर
महायुतीचे अमोल खताळ दुसऱ्या फेरीत आघाडीवर
भिवंडी ग्रामीण शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे आघाडीवर
तुळजापूर मतदारसंघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील 5550 मताने आघाडीवर
कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक आघाडीवर
जोगेश्वरीमधून शिंदे शिवसेना गटाच्या मनीषा वायकर आघाडीवर
उस्मानाबाद ठाकरे गटाचे कैलास पाटील 1632 मतांनी आघाडीवर
गिरीश महाजन 4405 मतांनी आघाडीवर
नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांची आघाडी कायम
मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू खरे आघाडीवर
येवला मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर
इंदापूर मतदारसंघातून दत्तात्रय भरणे आघाडीवर
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत रासणे आघाडीवर
पुरंदर विधानसभेतून महायुतीचे विजय शिवतारे आघाडीवर
साताऱ्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून अतुल भोसले 2624 मतांनी आघाडीवर
सातारा विधानसभेतून शिवेंद्रराजे 12731 मतांनी आघाडीवर
पाटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शंभुराज देसाई 1268 मतांनी आघाडीवर
फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील 1493 मतांनी आघाडीवर
वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील 4593 मतांनी आघाडीवर
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनोज घोरपडे 2884 मतांनी आघाडीवर
कोरेगावात दुसऱ्या फेरी अखेर महेश शिंदे पाच हजार सहाशे मतांनी आघाडीवर