Saturday, August 03, 2024 02:42:59 PM

DA
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. आधी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळेल. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यातील वाढीबाबतचा शासन निर्णय बुधवार १० जुलै रोजी काढण्यात आला. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. जानेवारीपासून ते जूनपर्यंतची थकबाकी या म्हणजेच जुलै महिन्याच्या पगारात देणार असल्याचे शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे. महागाई भत्त्यातील वाढ ही शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री