Thursday, September 12, 2024 06:08:24 PM

Marathi Film Awards
राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने

अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने

मुंबई : अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

५८ व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत.-

सर्वोत्कृष्ट कथा :- विठ्ठल काळे (बापल्योक), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ), रमेश दिघे ( फनरल उत्कृष्ट पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे  (बापल्योक ),गजेंद्र अहिरे( गोदाकाठ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट संवाद :- रमेश दिघे (फनरल), मकरंद माने, विठ्ठल काळे  (बापल्योक ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक), वैभव जोशी ( मी वसंतराव ), गजेंद्र अहिरे ( गोदाकाठ) 

उत्कृष्ट संगीत: - विजय गवंडे ( बापल्योक ), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), रोहित नागभिडे ( फिरस्त्या ) 

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- सारंग  कुळकर्णी, सौरभ भालेराव ( मी वसंतराव ), विजय गवंडे ( बापल्योक ), अद्वैत नेमळेकर (फनरल), 

उत्कृष्ट पार्श्वगायक:- अजय गोगावले ( बापल्योक ), आदर्श शिंदे (फिरस्त्या), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ) 

उत्कृष्ट पार्श्वगायिका:- आनंदी जोशी ( काळी माती ), सावनी रवींद्र ( जीवनाचा गोंधळ ), प्राची रेगे ( गोदाकाठ ) 

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- शर्वरी जेमनीस ( मी वसंतराव ), सुजितकुमार ( गोष्ट एका पैठणीची), सुजितकुमार (चोरीचा मामला ), 

उत्कृष्ट अभिनेता:- आरोह वेलणकर (फनरल), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), सिद्धार्थ मेनन (जून ) 

उत्कृष्ट अभिनेत्री :- सायली संजीव ( गोष्ट एका पैठणीची ), अक्षया गुरव ( बीटर स्वीट   कडुगोड ), मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ ) 

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला ), हेमंत ढोमे ( चोरीचा मामला ) 

सहाय्यक अभिनेता :- नितीन भजन ( सुमी ), विठ्ठल काळे ( बापल्योक ), पुष्कराज चिरपुटकर ( मी वसंतराव ) 

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल), नीता शिंडे ( बापल्योक ),  स्मिता तांबे  ( बीटर स्वीट  कडुगोड ), 

प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती), ओमप्रकाश शिंदे ( काळीमाती), वैभव काळे ( काळोखाच्या पारंब्या ) 

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पायल जाधव ( बापल्योक ), पल्लवी पालकर ( फास ) रेशम श्रीवर्धन ( जून )  

५९ व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत. -

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी), जयंत पवार ( भाऊ बळी ३६०० रुपयांचा सवाल ), सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं) 

उत्कृष्ट पटकथा :- रसिका अगासे ( तिचं शहर होणं ), वैशाली नाईक ( बाईपण भारी देवा ), निखील महाजन, प्राजक्त देशमुख ( गोदावरी ) 

उत्कृष्ट संवाद :-  रशिद उस्मान निंबाळकर ( इरगाल ), नितिन नंदन ( बाल भारती ), प्रकाश कुंटे ( शक्तिमान )  

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी ), वलय मुळगुद (बाई पण भारी देवा ), संदिप खरे ( एकदा काय झालं )  

उत्कृष्ट संगीत: - अमित राज ( झिम्मा ), डॉ.रुद्र कर्पे ( कुलूप ) सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं ) 

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- पंकज पडघन ( आणीबाणी ) ए.व्ही.प्रफुलचंद्र ( गोदावरी ), सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),  

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहूल देशपांडे ( गोदावरी ), शुभंकर कुलकर्णी ( एकदा काय झालं ), डॉ.भीम शिंदे ( इरगाल ) 

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर), आर्या आंबेकर ( कुलूप ) सुवर्णा राठोड ( बाईपण भारी देवा ) 

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive ), विठ्ठल पाटील ( पांडू ), सुभाष नकाशे ( बाईपण भारी देवा ) 

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)  सुमित राघवन ( एकदा काय झालं ), संदीप पाठक ( राख )  

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ), मृण्मयी देशपांडे ( बेभान), स्मिता तांबे ( गौरीच्या लग्नाला यायचंहं ) 

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू ), आनंद इंगळे ( लक डाऊन be positive ), सिद्धार्थ जाधव ( लोच्या झाला रे ) 

सहाय्यक अभिनेता :- प्रियदर्शन जाधव ( शक्तीमान), मोहन आगाशे ( कारखानिसांची वारी ), अमेय वाघ ( फ्रेम ) 

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ), क्षीती जोग ( झिम्मा ), शीतल पाठक ( जननी )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- रसिद निंबाळकर ( इरगाल ), महेश पाटील ( कुलूप ), योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )' 

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमध्वनी), सृष्टी वंदना(कुलूप), सृष्टी जाधव(इरगाल)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- सुकन्या कुलकर्णी-मोने ( बाई पण भारी देवा ), निर्मिती सावंत ( झिम्मा ), शुभा खोटे ( लक डाऊन be positive )


सम्बन्धित सामग्री