Friday, June 21, 2024 11:32:11 AM

Maharashtra Legislative Assembly
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील. पावसाळी अधिवेशनाआधी बुधवार, २६ जून रोजी विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 

विधान परिषद निवडणूक - 

  1. मतदान - बुधवार २६ जून २०२४
  2. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  3. मतमोजणी सोमवार १ जुलै २०२४

भाजपाचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

शिउबाठाचे उमेदवार

  1. अनिल परब - मुंबई पदवीधर
  2. ज. मो. अभ्यंकर - मुंबई शिक्षक

काँग्रेसचे उमेदवार

  1. रमेश कीर - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री