नवी दिल्ली : हरियाणापेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी हरियाणातील विजयानंतर महाराष्ट्रातील मतदारांना उद्देशून आवाहन केले, भाजपाने हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ४८ जागा जिंकल्या. या विजयामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपा हरियाणात सत्तेत आली आहे.
जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ९० पैकी ६२ जागा लढवल्या आणि २९ जिंकल्या. ही भाजपाची जम्मू काश्मीरमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हरियाणात सत्ता राखणाऱ्या भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. दोन्ही राज्यात चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणापेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हरियाणा विधानसभा निवडणूक - एकूण जागा ९०
भाजपा ४८
काँग्रेस ३७
अपक्ष ३
इंडियन नॅशनल लोक दल २
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक - एकूण जागा ९०
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ४२
भाजपा २९
अपक्ष ७
काँग्रेस ६
जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ३
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १
आम आदमी पार्टी १
जम्मू काश्मीर पीपल कॉन्फरन्स १