Thursday, September 05, 2024 11:54:32 AM

Ladka Bhau Yojana
लाडकी बहीण नंतर भावांसाठी योजना

लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुण भावांसाठी आकर्षक योजना जाहीर केली आहे.

लाडकी बहीण नंतर भावांसाठी योजना

पंढरपूर : लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुण भावांसाठी आकर्षक योजना जाहीर केली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, पदविकाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये तर  पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळणार आहे. याआधी महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये या पद्धतीने वर्षभरात अठरा हजार रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२४ मध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये थेट बँक खात्यात मिळतील. यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना राज्य शासनाकडून मोठी भाऊबीज मिळणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री