Monday, September 16, 2024 02:04:36 PM

Maharashtra
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला

सलग दोन वर्षे परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही माहिती ट्वीट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला

मुंबई : सलग दोन वर्षे परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही माहिती ट्वीट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात सत्तर हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत कर्नाटक दुसऱ्या, दिल्ली तिसऱ्या, तेलंगण चौथ्या, गुजरात पाचव्या, तामिळनाडू सहाव्या, हरयाणा सातव्या, उत्तर प्रदेश आठव्या राजस्थान नवव्या स्थानावर आहे. दुसऱ्या ते नवव्या क्रमांकांवरील राज्यांनी आकर्षित केलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. 

थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी सत्तर हजार ७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. याआधी २०२२ - २३ मध्ये महाराष्ट्रात एक लाख अठरा हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली होती. ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली, गुजरात या तीन राज्यांच्या एकूण परकीय गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे. तसेच २०२३ - २४ मध्ये महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार १०१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात तसेच कर्नाटकात झालेल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा जास्त आहे. 

राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार १६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. अडीच वर्षात सरकारने पाच वर्षांएवढे काम करुन दाखवू असे ठणकावले आणि तसे करुन दाखवले. आता सव्वा दोन वर्षांत राज्यात तीन लाख चौदा हजार ३१८ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे..., असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


सम्बन्धित सामग्री