Monday, December 30, 2024 09:30:19 PM

Mumbai
मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे.

मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित असतील. ही विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीची मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक प्रलंबित मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री