Tuesday, April 08, 2025 05:52:42 AM

एका मंत्रिमंडळ बैठकीत ४० निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला.

एका मंत्रिमंडळ बैठकीत ४० निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला. मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत ४० निर्णय घेण्यात आले.

  1. कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
  2. ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान
  3. ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार आणि एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
  4. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती, १२ हजार २२० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
  5. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प
  6. देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
  7. भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्ली, मालाड, वाढवण येथील जागा, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
  8. रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
  9. राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
  10. जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
  11. लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
  12. धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस सामाजिक विकासासाठी जमीन
  13. रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या एसआरएला गती देणार,जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
  14. केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग
  15. पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
  16. धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना
  17. सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
  18. धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना
  19. सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
  20. कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
  21. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
  22. जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य
  23. राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ, ४० हजार होमगार्डना लाभ
  24. नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शासनाकडे
  25. आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
  26. राज्यातील आणखी २६ आयटीआयचे नामकरण
  27. आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
  28. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवर आता १५ सदस्य
  29. अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
  30. बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था
  31. मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
  32. जिल्हा परिषदेतील २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय 
  33. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
  34. राज्यात विशेष शिक्षकांची पदे
  35. शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय
  36. अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा, समर्पित क्रिटीकल केअर विभाग सुरु करणार
  37. राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण
  38. नाशिकला डाळींब, बीडमध्ये सीताफळ इस्टेट
  39. वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र
  40. महसुली वाढीसाठी मुद्रांक अधिनियमांत सुधारणा
  41. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारला
  42. मिहान प्रकल्पाकरिता निधीस मंजुरी

सम्बन्धित सामग्री