Saturday, October 05, 2024 04:01:45 PM

Court
'लव्ह जिहाद म्हणजे मुसलमानांचं हिंदूंविरोधात कारस्थान'

विशिष्ट धर्माच्या समाजविरोधी घटकांचे वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देश 'लव्ह जिहाद'च्या मागे आहे. देशाच्या एकतेसाठी हे धोकादायक आहे', असे निरीक्षण उत्तर प्रदेशातील न्यायालयाने नोंदवले आहे.

लव्ह जिहाद म्हणजे मुसलमानांचं हिंदूंविरोधात कारस्थान

नवी दिल्ली : 'भारतात लोकसंख्यावाढ आणि आंतरराष्ट्रीय कारस्थानाद्वारे एका विशिष्ट धर्माच्या समाजविरोधी घटकांचे वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देश 'लव्ह जिहाद'च्या मागे आहे. देशाच्या एकतेसाठी हे धोकादायक आहे', असे निरीक्षण उत्तर प्रदेशातील न्यायालयाने नोंदवले आहे. 'हिंदू मुलींना धर्मांतरासाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्याद्वारे पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे', अशी टिप्पणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी केली. धर्मांतराचा देशाच्या एकता, एकात्मता आणि सार्वभौमत्वाला मोठा धोका असल्याचे दिवाकर यांनी नमूद केले.

आपली ओळख लपवून एका विद्यार्थिनीवर बलात्कार करुन धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाने मोहम्मद आलीम (२५) या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच्या वडिलांना आरोपीला मदत केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

बरेलीमध्ये संगणक प्रशिक्षण घेणारी पीडित तरुणी २० वर्षांची आहे. आलीमने आपले नाव आनंद असल्याचा बनाव करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केली. या प्रकरणात आरोपीला शिक्षा देताना न्यायालयाने 'लव्ह जिहाद'बाबत भाष्य केले. 'विवाह, नोकरी आदींचे आमिष दाखवून आणि मानसिक दबाव निर्माण करुन धर्मांतर करण्यात येते', असे नमूद करीत न्यायालयाने अशा प्रकारांसाठी परदेशी अर्थपुरवठा होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा हा कट असल्याचे मत न्यायाधीश दिवाकर यांनी नोंदवले. या प्रकारांना वेळीच पायबंद घातला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. या निकालाची प्रत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

प्रत्येकाला आपल्या धर्माच्या आचरणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. धर्माचरणाच्या या स्वातंत्र्यावर 'लव्ह जिहाद'मध्ये होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी गदा आणता येणार नाही, असेही न्या. रवीकुमार दिवाकर म्हणाले. 

           

सम्बन्धित सामग्री