Tuesday, July 02, 2024 09:40:11 PM

Loksabha Election
दिल्लीकर कोणाच्या पाठिशी ?

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी २५ मे २०२४ रोजी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

दिल्लीकर कोणाच्या पाठिशी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी २५ मे २०२४ रोजी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतल्या सर्व सात लोकसभा मतदारसंघांमध्ये २५ मे रोजी मतदान होईल. दिल्लीत लोकसभेसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. हे दोन्ही पक्ष भाजपाविरोधात उभे आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत दिल्लीकर कोणाच्या पाठिशी उभे राहणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

लोकसभा निवडणूक, सहाव्या टप्प्यात कोणत्या राज्यातील किती जागांवर मतदान ?

बिहार (८ जागा), हरियाणा (सर्व १० जागा), जम्मू आणि काश्मीर (१ जागा), झारखंड (४ जागा), दिल्ली (सर्व ७ जागा), ओडिशा (६ जागा), उत्तर प्रदेश (१४ जागा), आणि पश्चिम बंगाल (८ जागा).

राज्य/केंद्रशासित प्रदेश - मतदारसंघ

१ दिल्ली - चांदणी चौक, उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली
२ हरियाणा - अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिस्सार, कर्नाल, सोनीपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुडगाव, फरिदाबाद
३ उत्तर प्रदेश - सुलतानपूर, प्रतापगढ, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डोमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, मच्छलीशहर, भदोही
४ पश्चिम बंगाल - तमलूक, कंठी, घाटल, झारग्राम, मेदिनीपूर, पुरुलिया, बांकुरा, बिष्णुपूर
५ झारखंड - गिरिडीह, धनबाद, रांची, जमशेदपूर
६ बिहार - वाल्मिकी नगर, पश्चिम चंपारण, पुर्वी चंपारण, श्योहर, वैशाली, गोपालगंज (SC), सिवान, महाराजगंज
७ जम्मू आणि काश्मीर - अनंतनाग-राजौरी
८ ओडिशा - भुवनेश्वर, पुरी, ढेंकनाल, केओंझार (SC), कटक, संबलपूर


सम्बन्धित सामग्री