Thursday, December 19, 2024 05:47:43 PM

Legislative Council Speaker Ram Shinde
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे

एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. यामुळे भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे

महाराष्ट्र : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली. भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली आहे . विशेष म्हणजे एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. यामुळे भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

कोण आहेत राम शिंदे? 

राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस म्हणून ओळखले जाते. ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1200 मतांनी त्यांचा पराभव झाला.

दरम्यान विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पोस्ट केली आहे. आमदार राम शिंदे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा , चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीचे सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी नागपुरातील विधानभवनात 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे'.


 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo