Thursday, March 27, 2025 04:28:45 PM

Ladaki Bahin : कोणत्या लाडक्या बहिणी परत करणार हप्ता?

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही आतापर्यंत सर्वात आवडती योजना ठरली.

ladaki bahin  कोणत्या लाडक्या बहिणी परत करणार हप्ता

महाराष्ट्र: महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही आतापर्यंत सर्वात आवडती योजना ठरली. महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात मात्र आता महिलांना पुढच्या  हप्त्याची प्रतीक्षा असतांनाच काही लाडक्या बहिणींना सरकारला हप्ते परत करावे लागणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींची चिंता वाढतांना पाहायला मिळतेय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कोणत्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार? 

1.ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा बाद  केला जाईल. 

2.अर्ज बाद केल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.

 3.ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही.

4.ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील. तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील. तसंच सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

5.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.तसंच ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

दरम्यान आता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना पुढच्या हप्ता मिळण्याची शक्यता असून नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता परत करावा लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


 


सम्बन्धित सामग्री