Sunday, June 30, 2024 08:07:09 PM

L K Advani
अडवाणींना एम्समधून घरी आणले

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना एम्समधून घरी पाठवण्यात आले आहे. अडवाणींवर घरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत.

अडवाणींना एम्समधून घरी आणले

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना एम्समधून घरी पाठवण्यात आले आहे. अडवाणींवर घरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. लालकृष्ण अडवाणी ९६ वर्षांचे आहेत. वेगवेगळ्या शारीरिक व्याधींमुळे अडवाणींची तब्येत खालावली होती. एम्समधून घरी पाठवण्यात आले तरी अडवाणींवरील उपचार सुरुच राहणार आहेत. 

राष्ट्रीय राजकारणात लालकृष्ण अडवाणींनी भूषवलेली महत्त्वाची पदे

  1. लोकसभा, विरोधी पक्षनेते - मे २००४ ते डिसेंबर २००९ आणि २४ डिसेंबर १९९० ते २६ जुलै १९९३
  2. राज्यसभा, विरोधी पक्षनेते - २१ जानेवारी १९८० ते ७ एप्रिल १९८०
  3. उपपंतप्रधान - २९ जून २००२ ते २२ मे २००४
  4. गृहमंत्री - १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४
  5. भाजपाध्यक्ष - १९८६ ते १९९१ तसेच १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५
           

सम्बन्धित सामग्री