दक्षिण कुवेत : कुवेतच्या दक्षिणेकडील भागात एका सरकारी इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत ४१ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कुवेत येथील भारतीय दूतावासाने आग लागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण ४१ भारतीयांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. दूतावासाने संपर्कासाठी काही मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.