Friday, January 03, 2025 04:14:27 PM

Kolhapurkar's delicacies to welcome the new year
नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरकरांची खवय्येगिरी

कोणत्याही प्रसंगी कोल्हापूरकरांचा वेगळाच ढंग पाहायला मिळत असतो.

नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरकरांची खवय्येगिरी

कोल्हापूर : कोणत्याही प्रसंगी कोल्हापूरकरांचा वेगळाच ढंग पाहायला मिळत असतो. नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी खवय्येगिरीला प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. आज सकाळपासून शहरातील मटण-चिकन सेंटर्स आणि मासे बाजारात स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती.

हेही वाचा : पर्यटनाच्या नव्या ट्रेंडसाठी पर्यटक खवणे बीचकडे

थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सकाळपासूनच मटण, फिश आणि चिकन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. कोल्हापूरात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनचे जोरदार नियोजन सुरू आहे. सकाळपासूनच चिकन मटण सोबतच मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कोल्हापूरकरांनी आपल्या मित्र परिवारासोबत आणि फॅमिली सोबत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे यंदा घरगुती जेवण बनवून देणाऱ्यांना ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. मच्छी मार्केटमध्ये देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सुरमई, बांगडा, पापलेट खरेदीकडे नागरिकांचा कल पहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री