Friday, January 17, 2025 05:57:17 PM

Sindhudurg Tourism
सिंधदुर्गतील खवणे समुद्र किनाऱ्यावर कयाकिंग सफरीसह अद्भुत पर्यटनाचा अनुभव

कयाकिंग करतांना पर्यटकांना खाडीतील पाण्यात स्वतः बोट चालवण्याचा आनंद घेता येतो. कांदळवणातील पाण्यातून बोट चालवताना विविध पक्षी, कांदळवणातील वृक्षांचे प्रकार, धबधबे, गुहा आणि सेल्फी पॉईंट्स सफर..

सिंधदुर्गतील खवणे समुद्र किनाऱ्यावर कयाकिंग सफरीसह अद्भुत पर्यटनाचा अनुभव

सिंधदुर्ग : खवणे बीच, वेंगुर्ले पासून 12 ते 13 किलोमीटर, मालवण पासून 30 ते 35 किलोमीटर, आणि कुडापासून 20 ते 25 किलोमीटर दूर स्थित आहे. या अत्यंत सुंदर आणि शांतीपूर्ण समुद्र किनाऱ्यावर कयाकिंगचा अनुभव पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

कयाकिंग सफरीसाठी पर्यटकांना लाइफ जॅकेट दिलं जातं, आणि प्रत्येक बोटीमध्ये पर्यटकांसोबत एक गाईडही असतो. कयाकिंग करतांना पर्यटकांना खाडीतील पाण्यात वल्हवून स्वतः बोट चालवण्याचा आनंद घेता येतो. कांदळवणातील पाण्यातून बोट चालवताना विविध पक्षी, कांदळवणातील वृक्षांचे प्रकार, धबधबे, गुहा आणि सेल्फी पॉईंट्स या अनोख्या सफरीतून अनुभवता येतात.

कायाकिंग सफरीचा प्रवास दीड ते तीन किलोमीटरचा असतो आणि तो खवणे बीचवर परत येऊन थांबतो. या खाडीप्रवासाचे स्वरूप अद्वितीय आणि सुंदर आहे, जे पर्यटकांना नवा अनुभव देतो.

खवणे कांदळवण खाडीपात्रात 100 पेक्षा जास्त कयाकिंग सफरी बोटी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे व्यवसाय चालतात. पर्यटकांसाठी कयाकिंग सफरीसाठी 250 रुपये प्रतिव्यक्ती, तसेच बोट सफर साठी 1,000 ते 1,500 रुपये खर्च येतो. सफरीदरम्यान पर्यटकांची काळजी घेण्यासाठी लाइफ जॅकेट आणि सुरक्षा व्यवस्था असते.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

खवणे बीचवर आल्यानंतर पर्यटकांना मालवणी नाश्ता आणि जेवण उपलब्ध असते. याशिवाय, किनाऱ्यावरच्या शांततेचा आनंद घेत, अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवतात. या सुंदर ठिकाणी फॅमिली पर्यटनासाठी खूप पसंती मिळते, आणि खवणे बीच हे एक लोकप्रिय पर्यटक गंतव्य ठरले आहे.

तर, निसर्गप्रेमी आणि साहस प्रेमी पर्यटकांसाठी खवणे बीच एक आदर्श गंतव्य स्थान आहे, जिथे आपण निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटू शकता.

पर्यटनाची कयाकिंग खाडीपात्रातील सफर याचा अनुभव आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी घेत पर्यटकांशी व पर्यटन व्यावसायिकांशी खास संवाद साधला.. याचा खास रिपोर्ट..


सम्बन्धित सामग्री