Monday, July 01, 2024 02:58:06 AM

Jitendra Awhad
आव्हाडांकडून आंबेडकरांचा अपमान

ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्याच ठिकाणी राशपच्या जितेंद्र आव्हाडांनी धक्कादायक वर्तन केले. जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला.

आव्हाडांकडून आंबेडकरांचा अपमान

महाड : ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्याच ठिकाणी राशपच्या जितेंद्र आव्हाडांनी धक्कादायक वर्तन केले. जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. आंदोलन करत असताना आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

आव्हाड हे उद्धव सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. सध्या ते राशपचे आमदार आहेत. लोकप्रतिनिधी असूनही आव्हाडांनी आंबेडकरांचा अपमान केला. या प्रकाराची माहिती मिळताच अनेकांनी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी राशपमधून जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी रिपाईंच्या खरात गटाने केली आहे. तर आव्हाडांना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे.

 आव्हाडांनी माफी मागावी आणि त्यांच्या विरोधात कायद्यानुसार करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. चवदार तळ्यावर आंदोलन करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडणे ही कृत्य करून जितेंद्र आव्हाड यांनी ठरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रिपाईंच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केला आहे. 

आव्हाडांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी महायुतीकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हाडांचा निषेध केला. वंचितनेही आव्हाडांच्या कृतीचा निषेध केला. 
 


सम्बन्धित सामग्री