पुणे : सचिन वाझे हा सरकारचा प्रवक्ता असल्याचे राशपचे जयंत पाटील म्हणाले. वाझे सुटका व्हावी यासाठी कोणाच्या सांगण्यावरुन आरोप करत असल्याची शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली. सचिन वाझेला कधी भेटलो नाही, असाही दावा त्यांनी केला. याआधी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस सेवेत पुन्हा घेण्याच्या बदल्यात शरद पवारांना दोन कोटी रुपये दे असे देशमुखांनीच सांगितले, असा आरोप वाझेने केला होता. तर वाझेला कधी भेटलोच नाही असा दावा देशमुखांनी केला. विशेष म्हणजे पोलीस सेवेत असताना वाझेला विशेषाधिकार मिळाले होते. या विशेषाधिकारांवरुन पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. पण त्यावेळी राज्यात असलेले उद्धव सरकार या विषयावर मौन बाळगत होते.