Thursday, November 21, 2024 07:48:54 PM

Jasprit Bumrah
बुमराहने रचला इतिहास

चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.

 बुमराहने रचला इतिहास

चेन्नई - चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा कारनामा करणारा तो भारताचा १० वा गोलंदाज बनला आहे. या शानदार कामगिरीसह त्याने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला मागे सोडलं आहे.

असा रेकॉर्ड करणारा सहावा गोलंदाज

भारतासाठी ४०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून सर्वात जलद ४०० गडी बाद करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. या यादीत कपिल देव अव्वल स्थानी आहेत. कपिल देव यांच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६८७ गडी बाद केले आहेत. तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या नावे ६१० गडी बाद करण्याची नोंद आहे.

४०० गडी बाद करणारे खेळाडू-

  • कपिल देव - ६८७ आंतरराष्ट्रीय बळी
  • झहीर खान - ५९७ आंतरराष्ट्रीय बळी
  • जवागल श्रीनाथ - ५५१ आंतरराष्ट्रीय बळी
  • मोहम्मद शमी - ४४८ आंतरराष्ट्रीय बळी
  • इशांत शर्मा - ४३४ आंतरराष्ट्रीय बळी
  • जसप्रीत बुमराह* - ४०१ आंतरराष्ट्रीय बळी (*खेळत आहे) 

सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo