Wednesday, September 18, 2024 02:21:30 AM

Shivaji Maharaj Statue
आपटेला पोलीस कोठडी, पाटीलला न्यायालयीन कोठडी

राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आपटेला पोलीस कोठडी पाटीलला न्यायालयीन कोठडी

मालवण : राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच प्रकरणात स्थापत्यशास्त्र सल्लागार चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उद्घाटनानंतर जेमतेम आठ महिन्यांतच पडला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी माफी मागितली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार पुतळा प्रकरणी  दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. शिल्पकार जयदीप आपटे पोलीस कोठडीत आणि स्थापत्यशास्त्र सल्लागार चेतन पाटील न्यायालयीन कोठडीत आहे.


सम्बन्धित सामग्री