Sunday, April 13, 2025 02:20:36 AM

जे. पी. नड्डांचा शुक्रवारी मुंबई दौरा

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

जे पी नड्डांचा शुक्रवारी मुंबई दौरा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा रणनीती आखत आहे. याच दृष्टीकोनातून शुक्रवारी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. धार्मिक संस्थांचे विश्वस्त आणि ट्रस्टींसोबत नड्डा संवाद साधणार आहेत. तसेच विलेपार्ले येथील पाटीदार हॉलमध्ये दुपारी ३.४५ वाजता त्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित राहणार आहे. 

जे. पी. नड्डा यांचा हा महाराष्ट्र दौरा विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. वेगवेगळ्या रणनीती आखण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री