ठाणे : राशप नेते जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे पोलिसांकडे केली आहे.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका... निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती असे ट्विट करत एक ऑडिओ क्लिप पोस्ट आव्हाडांनी केली आहे.
अफवा पसरवण्यात हातकंडा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कथित ऑडिओ क्लिप पसरवली जात आहे.पोलिसांची व सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आव्हाडांकडून ही क्लिप स्क्रिप्टेड बनवलेली वाटत आहे.