Friday, September 06, 2024 08:40:13 AM

K 9 Dogs
पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताचे श्वान

पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताच्या श्वानांची मदत घेतली जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताचे श्वान

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी भारताच्या श्वानांची मदत घेतली जात आहे. आयोजकांनी भारत सरकारशी चर्चा करुन दहा के ९ श्वानांचे पथक देण्याची विनंती केली. केंद्र सरकारने ही विनंती मान्य करुन श्वान आणि त्यांना हाताळणारे कर्मचारी यांचे पथक पॅरिसला पाठवले आहे. सहा बेल्जियम, ३ जर्मन शेफर्ड आणि एक लॅब्रॅडॉर रीट्रिव्हर असे दहा के ९ श्वान आणि त्यांना हाताळणारे १७ कर्मचारी असे २७ जणांचे पथक पॅरिसमध्ये पाठवण्यात आले. 

के ९ श्वान म्हणजे काय ?

सुरक्षेशी संबंधित कामांसाठी प्रशिक्षित श्वान म्हणजे के ९ श्वान. हे श्वान सहा ते नऊ वर्षे लष्करात किंवा निमलष्करी दलात अथवा पोलीस दलात काम करतात. गस्त घालणे, अमली पदार्थ शोधणे, स्फोटके शोधणे, वासावरुन एखाद्या व्यक्तीचा माग काढणे ही प्रशिक्षित श्वानांची प्रमुख कामं आहेत. 


सम्बन्धित सामग्री