Sunday, October 06, 2024 05:49:15 PM

Terrorist Attack
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे अतिरेकी हल्ला झाला. गस्तीवर असलेल्या सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य करुन अतिरेक्यांनी हल्ला केला.

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला

कठुआ : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे अतिरेकी हल्ला झाला. गस्तीवर असलेल्या सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य करुन अतिरेक्यांनी हल्ला केला. एका टप्प्यावर वाहनाचा वेग कमी असताना अतिरेक्यांनी हल्ला केला. जोरदार गोळीबार केल्यानंतर अतिरेक्यांनी वाहनावर हातबॉम्ब फेकला. या हल्ल्यात सुरक्षा पथकाचे ४ जवान हुतात्मा झाले आणि ४ जवान जखमी झाले. हल्ला केल्यानंतर अतिरेकी जंगलात पळून गेले. या जंगलाचा एक भाग पंजाबच्या आणि दुसरा भाग हिमाचल प्रदेशच्या सीमेशी जोडलेला आहे. यामुळे जंगलात तातडीने शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री