Saturday, September 28, 2024 03:50:39 PM

Kanpur Test Match Update
कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

कानपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय आला आहे. कानपूर कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने आतापर्यंत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे. 

आकाशदीपने बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. नंतर अश्विनने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याला पायचीत केले. यामुळे अवघ्या ८० धावा झाल्या असताना बांगलादेशचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले. आता मोमिनुल हक आणि मुशफिकर रहिम हे दोघे नाबाद आहेत. बांगलादेशने ३५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. 

सलामीवीर झाकीर हसन शून्य धावा करुन यशस्वी जयस्वालकडे झेल देऊन परतला. तर शदमान इस्लाम २४ धावा करुन पायचीत झाला. या दोघांना आकाशदीपने बाद केले. नजमुल हुसेन शांतो ३१ धावा करुन अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला. 

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत झाला. हा सामना जिंकून भारताने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली. पाठोपाठ कानपूर कसोटीत दमदार सुरुवात करुन भारताने बांगलादेशवरील दबाव वाढवला आहे. 

भारत विरुद्ध बांगलादेश दोन कसोटी सामन्यांची मालिका
चेन्नई कसोटी : भारताचा २८० धावांनी विजय
कानपूर कसोटी : खेळ सुरू आहे


सम्बन्धित सामग्री