चेन्नई : भारत - बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईत होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन खेळाडूंनी भारताची लाज राखली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे प्रमुख खेळाडू अपयशी ठरले पण जडेजा आणि अश्विनच्या चमकदार खेळीने भारताचा डाव सावरला.
- भारत विरुद्ध बांगलादेश, चेन्नई कसोटी
- पहिल्या दिवसाचा खेळ संपला
- भारत : ६ बाद ३३९ धावा
- यशस्वी जयस्वाल - ५६ धावा
- रोहित शर्मा - सहा धावा
- शुभमन गिल - शून्य धावा
- विराट कोहली - सहा धावा
- रिषभ पंत - ३९ धावा
- केएल राहुल - १६ धावा
- रविंद्र जडेजा - नाबाद ८६ धावा
- रविंचंद्रन अश्विन - नाबाद १०२ धावा
बांगलादेशची गोलंदाजी : हसन महमूद (४ बळी), नाहिद राणा (१ बळी), मेहदी हसन मिराज (१ बळी)