Tuesday, September 17, 2024 08:40:48 AM

India
भारताकडे ८४६ टन सोन्याचा साठा

जागतिक पातळीवर वाढत असलेल्या अस्थिरता आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे.

भारताकडे ८४६ टन सोन्याचा साठा

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या अस्थिरता आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारतानेही बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जुलै महिन्यात सोन्याच्या साठ्यात पाच टनची भर घातली. भारताच्या मध्यवर्ती बँकेने २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण ४३ टन सोन्याची भर घातली. यामुळे देशाचा सोन्याचा साठा आता ८४६ टन झाला आहे. 

रशिया, चीन, भारत, तुर्की, कझाकस्तान, उझबेकिस्तान या आशियाई देशांनी मागील काही महिन्यांपासून सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. आशियातील निवडक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी वाढल्यामुळे बाजारातील सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या मते २०२४ हे वर्ष संपण्याच्या सुमारास सोन्याचा दर नवा उच्चांक गाठेल.
 


सम्बन्धित सामग्री