Saturday, January 11, 2025 10:08:50 PM

India - China
भारत - चीन तणाव कमी होणार

भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सहमती झाली आहे.

भारत - चीन तणाव कमी होणार

नवी दिल्ली : ब्रिक्स परिषदेआधी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सहमती झाली आहे. दोन्ही देशांची सुरक्षा पथके प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालतील. परस्पर सामंजस्यातून गस्त घातली जाईल. मागील काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होण्यास यामुळे मदत होईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. सहमती झाल्यामुळे मे २०२० पूर्वीची स्थिती निर्माण होण्यास मदत होईल, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. 

काय आहे पूर्व लडाख वाद ?

अक्साई चीन हा भूभाग भारताचा आहे पण त्यावर चीन दावा करतो. यातून पूर्व लडाख वादाला तोंड फुटले आहे. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील सीमेवरुन अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. जून २०२० मध्ये हा वाद आणखी वाढला. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांचा संघर्ष झाला. भारताचे कर्नल आणि सैनिक असे २० जण हुतात्मा झाले. चीनचे गलवान संघर्षात अनेक अधिकारी आणि सैनिक मारले गेले. यानंतर परिस्थिती चिघळली. तणाव वाढला. पण ब्रिक्स २०२४ परिषदेच्याआधी भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सामंजस्यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. 

                 

सम्बन्धित सामग्री